
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर: महावीर महाविद्यालयातील मराठी व हिंदी विभाग आयोजित दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदी गझल व कवितांचा मराठी अनुवाद प्रक्रिया व सादरीकरण वर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम अम्पी थेटर महावीर कॉलेज मध्ये आयोजित केला आहे.अनुवादक पी. डी. देशपांडे हे हिंदी गझल व कवितांचा मराठी अनुवाद: प्रक्रिया व सादरीकरण वर मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुषमा रोटे आहेत.त्याचबरोबर महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. पी. लोखंडे यांची उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक डॉ. गोपाळ गावडे, डॉ. महादेव शिंदे आणि डॉ.राजेंद्र रोटे यांनी यावेळी केले आहे.

