अनेक महिने खराब होणार नाही बटाटे, डॉक्टरांनी सांगितलं स्टोर करण्याची खास पद्धत

0
164
अनेक महिने खराब होणार नाही बटाटे, डॉक्टरांनी सांगितलं स्टोर करण्याची खास पद्धत

बटाटे एक भाजी आहे जी रोज भारतीय घरांमध्ये खाल्ली जाते आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाटे खाणं आवडतं. बटाटे खाण्याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण ते स्टोर करून ठेवण्याची समस्या सगळ्यांनाच होते.

जास्त दिवस बटाटे ठेवले तर ते खराब होतात, पण ते खराब होऊ द्यायचे नसतील तर एक उपाय समोर आला आहे. बटाट्यांना हवेची गरज असते. हवा मिळाली नाही तर त्यात फंगस होतात आणि त्यावर बुरशी चढते.

रुमेटोलॉजिस्ट आणि हेल्थ अॅन्ड वेलनेस ब्लॉगर डॉ. एरिन कार्टरने यांनी सांगितलं की, बटाटे योग्यपणे स्टोर केले जाऊ शकतात ज्यामुळे बटाटे एक महिना चांगले राहू शकतात. डॉक्टर कार्टर यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, बटाटे स्टोर करण्याची ही सगळ्यात सोपी आणि चांगली पद्धत आहे. याने बटाटे अनेक महिने चांगले राहू शकतात.

काय करावे उपाय?

1) बटाटे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्याऐवजी एका पेपर बॅगमध्ये टाका. बटाटे पेपर बॅगमध्ये ठेवल्याने खराब होणार नाहीत.

2) पेपर बॅगमध्ये बटाट्यांसोबत एक सफरचंद ठेवा. याने बटाटे खराब होणार नाहीत.

3) सफरचंद बटाट्यांसोबत ठेवल्यावर पेपर बॅग एका थंड आणि अंधाऱ्या जागेवर ठेवा. असं केलं तर अनेक महिने बटाटे खराब होणार नाहीत.

4) एक्सपर्ट म्हणाले की, बॅग खुली ठेवा. असं केलं नाही तर बटाटे लवकर सडू लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here