दत्तसेवा विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

0
402

SP9/ कोकरूड प्रतापराव शिंदे

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दत्तसेवा प्राथमिक विद्यालय तुरुकवाडी ता. शाहूवाडी येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे येथील प्रसिद्ध इंजिनिअर डॉ. शिवाजी सावंत, ठाणे महानगरपालिका उपप्रभाग अधिकारी श्रावण शाम तावडे, कॉन्ट्रॅक्टर मनोज वैती, दत्तसेवा समुहाचे संस्थापक आनंदराव माईंगडे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे विज्ञानाची माहिती झाली पाहिजे या हेतूने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय वेगवेगळे असे नाविन्यपूर्ण प्रयोग विज्ञान प्रदर्शनात मांडले आहेत यामुळे त्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल.

शिक्षकांनी असे वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका लता हारुगडे यांनी मानले. या विज्ञान प्रदर्शनात पहीली पासून सातवीपर्यंतच्या सुमारे दोनशे विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.

परीक्षक म्हणून प्रशासकीय अधिकारी जे. एस. पोतदार, निलम पाटील, दिपक येसले यांनी काम पाहिले. यावेळी दत्तसेवा सहकारी पतपेढीचे विभागिय अधिकारी लक्ष्मण पाटील, संस्थेचे सचिव डॉ. बाळासाहेब पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, उद्योजक सर्जेराव पाटील , पत्रकार प्रतापराव शिंदे आदींसह दत्तसेवा विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here