
सायबर संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन येथे दि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. रितीका चंदवाणी यांनी त्यांच्या स्वागत व प्रस्तावनेत मराठी गौरव गीत गायन केले. प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व विभाग प्रमुख आणि उपस्थितांनी प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर राज्यगीत पठण करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अहवालाचे अनावरण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तनया श्रीपाद पाटणकर बी एससी फूड टेक्नॉलॉजी प्रथम वर्ष हिने मराठी भाषा माहिती व महती विषयी भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा प्रा रितीका चंदवाणी व आभार प्रदर्शन सहा प्रा पूजा सारोळकर यांनी केले. फूड टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख श्वेता पाटील, फॅशन डिझाईन विभाग प्रमुख ज्योती हिरेमठ, इंटिरियर डिझाईन विभाग प्रमुख सीमा पाटील, वाणिज्य विभाग समन्वयिका डॉ. सुनिता दलवाई, पर्यावरण विभाग समन्वयिका पूजा सरोळकर, क्रीडा शिक्षक रामेश्वरी गुंजीकर व ग्रंथपाल अनुराधा कुंभार तसेच सर्व विभागातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्थ डॉ. आर. ए. शिंदे आणि सचिव सीए एच. आर. शिंदे यांचे सहकार्य लाभले.

