
सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेनशनल अँड व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमनस कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे राष्ट्रीय सेवा योजना २०२३-२४ अंतर्गत विशेष श्रमदान शिबीर दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ ते २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
“युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” या विषया अंतर्गत विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा आले होते. दिनांक २१ ते २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आमच्या स्वयंसेविका यांनी श्रमदान केले. यावेळी श्रमदानाचा खरा अर्थ समजला.आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे श्रम करतो त्यापाठीमागे आपला काही ना काही उद्देश असतो. धैर्यप्राप्तीसाठी परिश्रम हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये श्रमाचे खूप महत्व आहे. श्रमातून मनुष्य त्याच्या जीवनातील कठीण समस्यांवर सुद्धा मात करू शकतो. “श्रम हीच आपल्या यशाची चावी आहे”, याचा अर्थ समजला. शेतकरी शेतात उन्ह, वारा, पाऊस कोणत्याही परिस्थितीत आपल्यासाठी कष्ट करत असतो, हे श्रमदानातून समजले.अनेक थोरपुरुषांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला श्रमाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
“जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते…..” या श्रमदानास शिवाजी वि्यापीठातील एन एस एस चे समन्वयक मा. डॉ . प्रा.तानाजी चौगुले सरांनी भेट दिली. त्याच बरोबर विविध क्षेत्रातून आलेल्या व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याच सोबत कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना च्या पन्नास स्वयंसेविका एन एस एस च्या समन्वयक प्रा. सौ. सारिका भोकरे , प्रा.सौ.रामेश्वरी गुंजिकर, त्याच सोबत त्यांचे समन्वयक प्रा. कु पूजा सरोळक, प्रा. सौ.सुश्मिता अ.पाटील,प्रा. कु.सिध्दी शिंदे, प्रा.कु.साक्षी देसाई, प्रा. कु. दिप्ती पाटील, प्रा.कु.अनिषा पाटील,प्रा. उमामसिरा रेहेमतपुरे देखील या शिबिरामध्ये उपस्थित होते. या सर्व महाविद्यालयाच्या शिक्षकांनी शिबिर सक्षमपणे पार पाडण्यास शिबिरामध्ये उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. शिबिरासाठी संस्थेचे सचिव सीए.एच.आर.शिंदे व प्र. प्राचार्य डॉ.ए.आर.कुलकर्णी यांचे मोलाचे मा्गदर्शन लाभले.

