अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता इमरान हाश्मी, कधीच करत नव्हता ‘ही’ गोष्ट

0
149

अभिनेता इमरान हाश्मीनं आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी इमरान एक आहे. अनेक मोठे चित्रपट त्यानं केले आहेत. सध्या तो ‘शोटाइम’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

वेबसीरिजचं प्रमोशन करण्यासाठी तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. यातच इमरानने एक गुपित उघड केलं आहे. अभिनेत्यानं सांगितलं की तो एका गोष्टीसाठी खूप अंधश्रद्धाळू होता.

इमरान हाश्मी आणि श्रिया सरन यांनी नुकतेच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये श्रिया सरन हिने इमरान हाश्मी 8 आणि 13 क्रमांकाबाबत अंधश्रद्धाळू होता असं सांगितलं. आवारापन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान इमरान हाश्मी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याला 8 आणि 13 क्रमांकाबाबत विशेष सूचना द्यायचा, असं श्रियानं सांगितलं.

इमरान म्हणाला, ‘8 आणि 13 या दोन आकड्यांबद्दलचा माझा दृष्टीकोन OCD सारखा झाला होता. कारण मी हे आकडे कोणत्याही परिस्थितीत टाळण्याचा प्रयत्न केला. शुटिंगसाठी जेव्हा बाहेर जावं लागायचं तेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना 8 किंवा 13 नंबर असलेल्या खोल्या बूक न करण्यास सांगायचो. या दोन खास तारखांना माझ्या आयुष्यात काही चांगल्या घटना घडल्याचं लक्षात आल्यानंतर याबद्दलची माझी मतं कालांतराने बदलली’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here