
सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ (Abol Preetichi Ajab Kahani) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघे आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे.
आता या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे. ती म्हणजे मयुरीची आत्या सत्यभामाची. या भूमिकेत किशोरी अंबिये दिसणार आहेत.
किशोरी अंबिये त्यांच्या निरनिराळ्या व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सगळ्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी नेहमी आपलं प्रेम दाखवलं आहे. आता ही नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का, हे येत्या रविवारी ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पाहता येईल. मयूरीची आत्या सत्यभामा या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे मालिकेत आणखीन रंगत येणार आहेत.


