वन प्लसची 12R Genshin Impact एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

0
150

बाजारात वन प्लसच्या स्मार्टफोनची चांगली चलती आहे. या स्मार्टफोन्सना ग्राहकांची उत्तम पसंती मिळते आहे. त्यामुळे कंपनीही अधिक चांगले व अत्याधुनिक स्मार्टफोन्स आता बाजारात आणते आहे.

वन प्लस 12R नंतर आता वन प्लसने नवी Genshine Impact एडिशन लाँच केली आहे. यात अनेक बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या या नव्या एडिशनबद्दल सर्वकाही.

वन प्लस स्मार्टफोन्सला ग्राहकांचा प्रतिसाद पाहता, कंपनीने वन प्लस 12Rचा भाग असलेला वन प्लसचा12R Genshin Impact एडिशन फोन लाँच केलाय. 12R या आधीच भारतात लाँच झाला आहे. सध्याचा लोकप्रिय खेळ Genshin वरून या नव्या विशेष एडिशनचं डिझाईन तयार करण्यात आलंय. याचं स्पेसिफिकेशन मूळ 12R एडिशनसारखंच साधारण ठेवण्यात आलंय. मात्र इंटरफेस, बाहेरचा रंग अशा काही गोष्टींमध्ये बदल करण्यात आलाय.

मोबाईलच्या युजर इंटरफेसमध्ये काही क्रिएटिव्ह आयकॉन्सचा वापर करण्यात आलाय. तसंच यातल्या नवीन वॉलपेपर्स आणि इंटरफेसला जांभळा रंग देण्यात आलाय. या विशेष एडिशन स्मार्टफोनसोबत ग्राहकांना एक कस्टमाईज्ड चार्जर, एक फोन स्टँड आणि रिडिझाईन्ड सिम इजेक्टर टूल मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाची Oriental AMOLED LTPO स्क्रीन दिलेली आहे. तिचं रिझोल्युशन 1264 x 2780 आहे. त्यात जास्तीतजास्त 4500Nits चा ब्राईटनेस मिळतो. हा हँडसेट 120Hz Adaptive Refresh Rateने मिळतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass Victus 2चं कोटिंग करण्यात आलं आहे.
प्रोसेसर आणि रॅम

वन प्लस 12R मध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट वापरण्यात आलाय. हा प्रोसेसर 2023 मध्ये अनेक फ्लॅगशिप फोन्समध्ये वापरण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये 16 GB ची LPDDR5x रॅम आणि 1TB UFS 4.0 टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे.
कॅमेरा

यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातल्या प्रायमरी कॅमेरात 50 MP Sony IMX890 सेन्सर आहे, त्यात f/1.8 लेन्स आणि OIS सेन्सर दिलाय. सेकंडरी कॅमेरा 8 MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह आहे. तिसरा कॅमेरा 2 MP चा मायक्रो कॅमेरा सेन्सर असलेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP चा सेन्सर आहे.

फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी
या मोबाईलमध्ये 5500mAh ची बॅटरी आहे. त्यासाठी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे, मात्र त्याच्या IP68 रेटिंगची माहिती उपलब्ध नाही.

Genshin Impact ची किंमत
हा फोन 49,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. या किमतीत ग्राहकांना 12GB रॅम आणि +256GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. याच्या ओरिजनल व्हर्जनची किंमत 39,999 आहे. 19 मार्चपासून या हँडसेटची विक्री सुरू होणार आहे.
फास्ट चार्जिंग, युजर इंटरफेसमधील क्रिएटिव्ह आयकॉन्स, नवीन डिझाईन अशा गोष्टांसाठी हा वन प्लस 12R Genshine Impact स्मार्टफोन बाजारात ग्राहकांची पसंती मिळवतो का ते लवकरच कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here