शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये, अन्यथा.’; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले.

0
571

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे आता आगामी निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यावी, असा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

। Shahu Maharaj

छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवल्यास विजयश्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा शरद पवार यांचा मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी महाविकास आघाडीला कोणताही धोका पत्करायचा नाही.

त्यामुळे कोणीही विरोध करू शकणार नाही, असा उमेदवार देण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. या संदर्भात शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली असल्याचं सांगण्यात येत आहे. जर शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली तरी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी हे काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे.

दरम्यान, अश्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये. कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येण्यासाठी मला जीवाचं रान करावे लागेल. हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करावं लागेल..’ असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. Hasan Mushriff |

यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्याला छत्रपती घराण्याविषयी मोठा आदर आहे. छत्रपती घराण्याला आणि शाहू महाराजांना मानणारा मोठा वर्ग कोल्हापुरात आहे. यामुळे शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली तर ही निवडणूक काँटे की टक्कर होईल, यामुळे श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये असं आम्हा सर्वांना वाटतं असं मुश्रीफ म्हणाले. । Shahu Maharaj

तसेच ते आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. ही लोकशाही आहे मात्र त्यांनी राजकारणात यावं किंवा न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीमंत शाहू महाराज एक आदर्श स्थान असल्यामुळे ते स्थान तसंच रहावे यासाठी त्यांनी निवडणूक लढवू नये, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here