फुकट्या प्रवाशांकडून एका महिन्यात १.७५ कोटींची कमाई, पुणे रेल्वे विभागाची कारवाई

0
92

कोल्हापूर : पुणे विभागात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच जाणाऱ्यांकडून पुणेरेल्वेला तब्बल १.७५ कोटी रुपयांची कमाई झालेली आहे.

पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारीमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २२,१८२ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १.७५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने ८, ३९२ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ४९.९८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १६५ प्रवाशांकडून १८, २५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरु आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन त्यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here