गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा सूत्रधार डॉ. निलेश साबळेंने या शो ला रामराम केला. त्यानंतर कुशल बद्रिकेने देखील ‘झी मराठी’चे आभार मानणारे पत्र पोस्ट केले. यानंतर आता कुशलने तो या कार्यक्रमातून एक्झिट घेणार की नाही याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
कुशल बद्रिकेच्या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो समोर
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे कुशल बद्रिके हा घराघरात पोहोचला. त्याला विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून ओळखले जाते. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवल्यानंतर आता कुशल बद्रिके हा एका हिंदी विनोदी कार्यक्रमात झळकत आहे. सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामध्ये कुशल झळकणार आहे. येत्या 9 मार्चपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यापूर्वी या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.