आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळं, लगेच दूर होतील अनेक समस्या…

0
47

जर तुम्हाला नेहमीच पचनासंबंधी समस्या होत असेल की, जसे की, अ‍ॅसिड रिफ्लक्स (गर्ड), सूज, कब्ज, छातीत जळजळ, वेदना, मळमळ, उलटी, गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, भूक न लागणे, अपचन, थकवा कमजोरी इत्यादी समस्या होत असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुमच्या आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा झाले आहेत.

असं मानलं जातं की, जास्तीत जास्त आजारांची सुरूवात तुमच्या पोटापासून होते. तुम्ही जेही खाता त्यातील तत्व आतड्यांमध्ये जमा होत असतात. हळूहळू पोटात विषारी पदार्थ जास्त जमा होतात. ज्यामुळे शरीराला वेगवेगळ्या समस्या होतात. शरीर चांगलं आणि निरोगी ठेवण्यासाठी पोट आणि आतड्यांची नियमित स्वच्छता करणं गरजेचं असतं.

एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी आणि आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काही फळांचा समावेश करू शकता. याने तुम्हाला खूप फायदा होईल.

सफरचंद

सफरचंदमध्ये भरपूर फायबर असतं. याचं नियमित सेवन केल्याने मल त्याग करण्यास आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते. यात पेक्टिनही असतं. हे एक असं तत्व आहे जे आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं.

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या फळांमध्ये फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. ज्यामुळे पचनही चांगलं होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या रोखण्यासही मदत करतात.

पेर

पेर हे एक असं फळ आहे ज्यात फायबर भरपूर असतं. याने मल त्याग करण्यास खूप मदत मिळते. तसेच याने आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत मिळते.

आलूबुखारा

आलूबुखाऱ्यामध्येही अनेक महत्वाचे तत्व असतात. यात सोर्बिटॉल असतं जे एक शुगर अल्कोहोल आहे. याने मल नरम करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते.

कीवी

कीवीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी आणि पनचाला मदत करणारे एंझाइम्स असतात. यात एक्टिनिडॅनही असतं. हे एक नैसर्गिक एंझाइम आहे जे प्रोटीन तोडण्यास आणि पचन वाढवण्यास मदत करतं.

संत्री

संत्री आणि इतर आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर असतं. जे पचन वाढवण्यास मदत करतात. पोट साफ झालं तर शरीरात विषारी पदार्थ राहणार नाही. त्यामुळे यांचं नियमित सेवन केलं पाहिजे.

अवोकाडो

अवोकाडोमध्ये फायबर, हेल्दी फॅट आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात. जे पचनास मदत करतात. एवोकाडोमध्ये फायबरही भरपूर असतं ज्याने तुम्हाला मल त्याग करण्यास मदत मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here