हल्ली पेनकिलर घेण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. डोकेदुखीपासून ते मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीपर्यंत कोणत्याही त्रासासाठी अनेकजण सर्रासपणे पेनकिलर घेऊन मोकळे होतात.
पण असं डॉक्टरांना न विचारता मनानेच पेनकिलर घेणं आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
तुमच्या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घेण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा (4 Natural pain killer according to ayurveda). आपल्या स्वयंपाकघरात आपण जे पदार्थ अगदी रोज वापरतो, तेच पदार्थ आयुर्वेदानुसार पेन किलर म्हणूनही काम करतात.(Natural remedies for pain relief)
कोणता त्रास कमी करण्यासाठी कोणता पदार्थ कशा पद्धतीने खावा, याविषयी डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती वाचा. ही माहिती आहारतज्ज्ञांनी dt.shwetashahpanchal या पेजवर शेअर केली आहे.
मासिक पाळीदरम्यान अनेकजणींचे पोट खूप दुखते. कंबर, पाठीमध्ये वेदना होतात. पोटऱ्या ओढल्यासारख्या वाटतात. हा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा चहा किंवा काढा करा आणि गरम असतानाच प्या. चवीसाठी त्यात थोडा गूळ घाला. यामुळे मासिक पाळीतल्या वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होतील.
दुसरा पदार्थ म्हणजे लवंग. जर हिरड्या ठणकत असतील, दाढ दुखत असेल तर अशावेळी त्या ठिकाणी थोडावेळ लवंग दाबून धरा. लवंगमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक असतात. यामुळे दातांचं दुखणं कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल.
तिसरा पदार्थ आहे लसूण. जर जॉईंटपेनचा त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी लसूण अतिशय उपयुक्त ठरतो. यासाठी तिळाच्या तेलामध्ये काही लसूण पाकळ्या ठेचून टाका. हे तेल थोडं उकळून घ्या. हे तेल कोमट झालं की त्याने दुखणाऱ्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करा.
दुखऱ्या भागावर किंवा जखमेवर हळद लावण्याचा उपाय आपल्याला माहितीच आहे. अंगात कणकण असेल, अंगदुखी असेल तर अशावेळीही हळदीचा काढा पिणं उपयोगी ठरतं.