जया बच्चन यांच्या वडिलांचा लग्नाला होता नकार

0
72

बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ३ जून १९७३ रोजी लग्न केलं होतं. पण या दोघांच्या लग्नाचा किस्सा रंजक आहे. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्या वडिलांना लग्नासाठी फोन केला होता.

पण नक्की काय घडलं होतं की ज्यामुळे जया बच्चन यांचे वडील या लग्नाला परवानगी देत नव्हते . यासाठी संपूर्ण लेख जरूर वाचा…

जया बच्चन जेव्हा मनोरंजन क्षेत्रात आल्या तेव्हा फार उत्साही होत्या. त्यांचा अभिनय त्याचबरोबर त्यांचं दिसणं यामुळे जया बच्चन यांना अनेक चांगले रोल मिळत गेले.जया बच्चन यांचा पहिला चित्रपट महानगर हा आहे जो बंगाली होता.त्यांना बॉलिवूडमध्ये गुड्डी या चित्रपटातून ओळख मिळाली . जया बच्चन यांना हॉलिडे ट्रीप ला जायचं होतं आणि याचवेळी त्यांनी घरातून परवानगी घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांना विचारलं होतं. अमिताभ आणि जया बच्चन दोघेजण हॉलिडे ट्रीपला जाणार होते. पण अमिताभ बच्चन यांच्या घरच्यांनी या ट्रीपला जाण्यासाठी नकार दिला. सोबतच अमिताभ बच्चन यांना त्यासाठी जया बच्चन यांच्याशी लग्न करावं लागेल अशी अट घातली होती.

“जर तुम्हा दोघांना हॉलिडे ला जायचं असेल तर तू जयाशी लग्न कर”,अशी अट अमिताभ बच्चन यांच्या घरच्यांनी घातली होती. त्यावर अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांना सांगितलं की ही अट मला घरच्यांनी घातली आहे तेव्हा जया बच्चन यांनी ही अट मान्य असल्याचे सांगितलं होतं . पण जया बच्चन यांनी सुद्धा अमिताभ बच्चन यांना एक अट घातली होती . ती अशी होती की अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्या वडिलांना फोन करावा लागणार होता आणि त्यांच्याकडून लग्नाची परवानगी घ्यायला लागणार होती.

त्यानुसार जया बच्चनच्या वडिलांना अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी यांनी कॉल केला होता आणि जया बच्चन यांचा हात मागितला. यावर त्यांच्या वडिलांनी जया बच्चन यांना चांगलं सुनावल होतं . त्यांच्या वडिलांचा असं म्हणणं होतं की,”लग्न ,मुलं यापेक्षा करिअरला महत्त्व दे. जर तू या वयात लग्न करून बसलीस तर निश्चितच तू ठराविक काळापर्यंतच या क्षेत्रात राहशील . पण जया बच्चन यांचं अमिताभ बच्चन यांच्यावरअसणारं प्रेम त्यांना रोखू शकलं नाही. त्यानंतर काही कालावधीने जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न केलं

जर जया बच्चन यांनी आपल्या वडिलांचं ऐकलं असतं तर कदाचित त्या आता बिग बींच्या पत्नी म्हणून ओळखल्या गेल्या नसत्या. बिग बींच्या प्रसिद्धीपुढे पुढे जया बच्चन यांचे करिअर मात्र फारसं काही फुललं नाही असंही म्हटलं जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here