रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हा युवक आघाडी व करवीर तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी करवीर पंचायतीसमोर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने गटविकास अधिकारी यादव यांच्यासमोर टाहोच फोडला.
जोर से बोल जय भीम बोल,उठ दलिता हल्लाबोल, आर्थिक व्यवहारातून जनतेला लुबाडणाऱ्या ग्रामसेवकांचा धिक्कार असो, त्या ग्रामसेवकांना निलंबित करा, गायरान जमिनीवर घरकुल द्या,आर्थिक व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
युवक आघाडीच्या या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा मोर्चा प्रामुख्याने करवीर तालुक्यामध्ये बरेच ग्रामसेवक आर्थिक व्यवहार केल्याशिवाय कामे करत नाहीत उदा.रोहिदास चौगुले हे ग्रामसेवक ग्रामस्थांना पैसे घेतल्यावरच त्यांच्या कामाला प्राधान्य देतात. हे दिसून आले.
तब्बल लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार हे करतात अशा ग्रामसेवकांवर गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश देऊन देखील कोणतेही कार्यवाही केली नाही. याबद्दल गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांचा निषेध करण्यात आला.
याबरोबरच केर्ली,गांधीनगर, चिंचवाड, गडमुडशिंगी या गावांमध्ये तेथील ग्रामसेवकाने केलेला मोठा भ्रष्टाचार पुराव्यांशी गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतेही कार्यवाही केली नाही म्हणून त्यांना या कार्यकर्त्यांनी जाब विचारला.
कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनालाही बोलवण्यात आले. गटविकास अधिकारी यावर लक्ष घालत नाहीत याचा जाब जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी विचारत त्यांना घाम फोडला. जोपर्यंत आम्हाला तुम्ही लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला त्यानंतर हे आक्रमक रूप पाहून दिलेल्या निवेदनाची दूरध्वनीच्या माध्यमातून वरिष्ठांना माहिती देऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
त्यावेळी कार्यकर्ते हे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठीया मांडून बसले होते. यावेळी देखील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गटविकास अधिकारी येऊन जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणाने सोडवले जातील असे सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी लेखी आश्वासनाच्या माध्यमातून आंदोलन मागे घेतले.
परंतु कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना जर या दिलेल्या प्रश्नांची सोडवणूक नाही केली तर भ्रष्टाचारी ग्रामसेवक आणि तुमची खुर्ची बाहेर फेकली जाईल असा सज्जड दम दिला आणि हे आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात करवीर तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष सुभाष कांबळे,उपाध्यक्ष संतोष कांबळे, आयटी सेल प्रमुख अमर कांबळे, गांधीनगर शहराध्यक्ष अंकुश वराळे, अभिजीत कागले, सरदार कांबळे, सतीश कांबळे, नितीन कांबळे, सर्जेराव कांबळे, अतुल सडोलीकर, प्रदीप मिरजकर, भीमराव कांबळे ,सचिन कोणवडेकर, बिट्टू सांगवडेकर, बबन कांबळे,लखन कांबळे, अरुण कांबळे, विजय कांबळे, आकाश जाधव, संग्राम कांबळे, विलास पवार, कुमार कांबळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते