महाराष्ट्रा सह अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात बसले 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के..!

0
221


प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा


मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
आज २१ मार्च सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकजण घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर ४.२ अशी नोंद करण्यात आली आहे. अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले.

हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यांतअसून ३.६ तर ४.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली आहे. या सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा तर दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेल्याची माहिती आहे.
दरम्यान अरुणाचल प्रदेशात ही आज गुरुवार दि २१ मार्च रोजी पहाटे १.४९ मिनिटांनी ३.७ रिश्टर स्केल चा भुकंप झाल्याची माहिती मिळत आहे. यांचा केंद्र बिंदू अरुणाचल प्रदेश च्या पश्चिम कामेंग येथे होता. या मध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here