
. प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : माझ्या सह शिवसेना शिंदेंगटाच्या १३ विद्यमान खासदारांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदेंगटाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या बाबतीतली शंका दूर करण्यात आली आहे. भाजपा ,शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दिल्लीत लवकर आणखी एक बैठक होऊन त्या बैठकीत उमेदवारीवर एक दोन दिवसात शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून बसलेले कोल्हापुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक शनिवारी कोल्हापुर परतले . गेले काही दिवस मुंबईत असल्या कारणाने कार्यकर्त्यांशी चर्चा करता आली नव्हती ; परंतू आता कार्यकत्यांशी संवाद साधून प्रचार यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने सुचना करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या मध्ये निवडणूक होत असून माझे व्यक्तिगत पातळीवर कोणाशीही शत्रुत्व नाही; परंतु प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे या पेक्षा आपल्या विचारांच्या लोकांना एकत्रित करून या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाणे महत्त्वाचे आहे, असे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.

