
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक नसून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा डॉ. चेतन नरके यांनी आज २८ मार्च रोजी केली आहे. मी गेल्या तीन चार वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी करत असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्यासाठी सोयीचा नाही असे ते यावेळी बोलताना म्हणाले. गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या तिकिटावर लढण्याची तयारी करत असलेल्या डॉ. चेतन नरके यांनी मोर्चेंबांधणी करताना मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा उभी केली होता. पण आता बदलत्या राजकिय उलथापालथी मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघांची जागा काँग्रेसला गेल्या कारणाने त्यांच्यासाठी राजकिय पेच निर्माण झाला आहे. आज २८ मार्च कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आपली राजकीय भुमिका मांडताना डॉ. चेतन नरके यांनी आपली राजकिय दिशा स्पष्ट करताना. ते म्हणाले,कि ” मी गेल्या तीन चार वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकी मध्ये उतरण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी मी संपुर्ण कोल्हापुर लोकसभा मतदासंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे मला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील समस्या अडीअडचणी योग्य जाण आहे. पण मला शिवसेना उबाठा गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्याबाबत विचारले असता मी त्याना स्पष्ट पणे नकार दिला आहे. कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मोठा असून उरलेल्या ३० दिवसांमध्ये मतदारांच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही ” असे ते यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

