
प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदेंगटाकडुन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचा मित्रपक्ष ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यास स्पष्ट नकार कळविल्यानंतर, बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने-शेट्टी-आवाडे अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटांच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. त्या भेटीत निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांची लवकरच राहुल आवडे भेटणार घेणार आहेत.आवाडे यांचा ताराराणी पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपला बाहेरून पाठिंबा देत आले आहेत. परंतु यंदाच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चेत विचारात घेतले नाही अशी नाराज व्यक्त करत आम्ही स्वता निर्णय घेतल्याचे राहुल आवाडे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान दुसऱ्या बाजू पहायला गेले तर ठाकरे गटात देखील ताकदवान उमेदवार नसल्याने राहुल आवाडे यांच्या रूपाने ठाकरेंना मोठी ताकद या मतदारसंघात मिळू शकते. मात्र राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरले तर राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

