आज रंगपंचमी, जाणून घेऊया कथा आणि इतर खास मान्यता

0
150

रंगपंचमी हा सण होळीचे शेवटचे पर्व मानले जाते. या दिवशी देवतांसह होळी खेळली जाते. हा सण दरवर्षी होळीनंतर शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तिथी ३० मार्च शनिवार आहे. शास्त्रानुसार देवी-देवतांना समर्पित रंगपंचमीच्या या सणाला देव पंचमी असेही म्हणतात. या दिवशी देवी-देवता एकत्र होळी खेळतात तेव्हा सुख, समृद्धी आणि वैभवाचा आशीर्वाद देतात.या सणाच्या दिवशी काही ठिकाणी घरोघरी पुरण पोळी बनवतात. रंगपंचमीचे महत्त्व लक्षात घेऊन आणखी एक नाव प्रचलित आहे, त्याला श्री पंचमी म्हणतात. या दिवशी देवतांसह रंग गुलाल खेळल्याने घरातील समृद्धी वाढते. रंगपंचमीच्या दिवशी रंग अंगाला लावला जात नाही तर रंग हवेत उडवला जातो आणि रंग हवेत उडाला की तमोगुण आणि रजोगुणाचा नाश होतो. त्यांचा नाश झाल्यावर पुण्यशक्ती वाढते.प्राचीन काळी जेव्हा होळीचा सण अनेक दिवस साजरा केला जात असे, तेव्हा रंगपंचमीचा दिवस हा होळीचा शेवटचा दिवस मानला जायचा आणि त्यानंतर रंग खेळले जात नाहीत. हा सण देशात अनेक ठिकाणी साजरा केला जात असला तरी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये हा सण सर्वाधिक साजरा केला जातो. या दिवशी देवतांना रंग चढवले जातात आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्ण राधा राणीसोबत होळी खेळतात, म्हणून या दिवशी श्रीकृष्ण आणि राधेला रंग चढवला जातो.रंगपंचमी संबंधी एक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, होळाष्टकाच्या दिवशी जेव्हा भगवान शंकराने कामदेवाला जाळून राख केले होते, तेव्हा संपूर्ण देवलोकात शोक पसरला होता. सर्व देवी-देवतांना चिंता वाटू लागली की कामदेवशिवाय जग कसे चालवायचे. त्यानंतर सर्वांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. परमेश्वराने देवतांची प्रार्थना स्वीकारली आणि कामदेवाला पुन्हा जिवंत केले. असे केल्याने संपूर्ण देवलोकातील देवता प्रसन्न झाले आणि रंगोत्सव साजरा करू लागले. तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here