साथरोग सर्वेक्षणात राज्यात कोल्हापूर अग्रेसर-डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी

0
184


  • कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): एकात्मिक साथरोग सर्वेक्षण कार्यक्रमात माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ निर्देशांकातील सादरीकरण व सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्हा राज्यात कोल्हापूर अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
    माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ अखेर प्राप्त झालेल्या गुणानुक्रम अहवालात लक्षणावर आधारित (Syndromic) सर्वेक्षण, आजाराच्या गृहीतकांवर (Presumptive) आधारित सर्वेक्षण, प्रयोगशालीय (Lab Confirmed) सर्वेक्षण, साथरोग सर्वेक्षण (CASE Reporting), साथरोग उद्रेक प्रतिसाद (Outbreak Response) या सर्व निर्देशांकातील सादरीकरणात कोल्हापूर जिल्ह्याने जिल्हा महाराष्ट्र राज्यात अग्रेसर आहे.
    तसेच, जिल्ह्यातील ७६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४१४ उपकेंद्र, १५ ग्रामीण रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालय व १ जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकात्मिक साथरोग सर्वेक्षण कार्यक्रमात येथील विविध संसर्गजन्य आजारांची माहिती राज्यपातळीवर आणि केंद्रस्तरावर दैनंदिन व मासिक स्वरुपात सर्वेक्षण, साथ नियंत्रण अहवाल सादरीकरण होते. या आजारात डेंगू, हिवताप, चिकुनगुनिया, झिका, कावीळ, अतिसार, कॉलरा, कोविड १९, स्वाईन फ्लू, रेबीज आदी आजारांचा समावेश आहे.
    00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here