पतीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं, ‘तिला एकही रुपया देऊ नका..’

0
137

लव्ह मॅरेज करूनही बी-टाऊनमधल्या अनेक जोडप्यांचं लग्न यशस्वी होऊ शकलं नाही. म्हणूनच लग्नाच्या काही वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला आणि नंतर दुसरा जोडीदार शोधला.बॉलिवूड विश्वात अफेअर, ब्रेकअप, लग्न आणि मग घटस्फोट या गोष्टी फार सर्वसामान्य झाल्या आहेत

याच इंडस्ट्रीत एक अभिनेत्री अशीही आहे, ज्यांनी मोठ्या बिझनेसमनशी लग्न केलं आणि काही महिन्यांतच हे दोघं विभक्त झाले. 70 च्या दशकात या अभिनेत्रीची गणना बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जायची. एका विवाहित अभिनेत्यासोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा आजही चवीने चघळल्या जातात. या अभिनेत्रीने एकेकाळी मोठ्या व्यावसायिकाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर तिला पतीविषयी अशी गोष्ट समजली, ज्यामुळे सहा महिन्यांतच तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूडच्या एव्हरग्रीन रेखा आहेत. त्यांनी 1979 मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण केलं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वांनाच माहित आहेत. मात्र रेखा यांनी दिल्लीचे बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. 4 मार्च 1990 रोजी जुहूमधल्या मुक्तेश्वर देवालय मंदिरात रेखा आणि मुकेश यांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर रेखा यांच्यासमोर मुकेश यांच्याविषयी अनेक खुलासे झाले आणि दोघांमध्ये खूप भांडणं होऊ लागली होती. जेव्हा रेखा त्यांची सेक्रेटरी फरजाना यांना सोडायला तयार नव्हत्या, तेव्हा मुकेश यांना ही गोष्ट सहन झाली नाही.सतत होत असलेल्या भांडणांमुळे रेखा यांनी मुकेश यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट जेव्हा मुकेश यांना समजली तेव्हा त्यांच्यासाठी हा धक्का पचवणं कठीण होतं. लग्नाच्या सहा महिन्यांतच त्यांनी रेखा यांच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. आयुष्य संपवण्याआधी त्यांनी एक सुसाइड नोटसुद्धा लिहिली होती. दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार हे मुकेश अग्रवाल यांचे खूप जवळचे मित्र होते. मुकेश यांच्या आत्महत्येनंतर त्यांनी खुलासा केला होता की रेखा यांनी दिवंगत पतीच्या संपत्तीमधून एकही रुपया मागितला नव्हता. मुकेश यांच्या भावानेही स्पष्ट केलं होतं की जे लोक असं म्हणतात की रेखा यांनी मुकेशशी पैशांसाठी लग्न केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here