
प्रतिनिधी: मेघा पाटील
कोल्हापूर : पुणे/ बालेवाडी येथे झालेल्या डबल ट्रॅप शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या जे बी कुसाळे शूटिंग फाउंडेशनच्या नेमबाजानी घवघवीत यश संपादन केले आहे.यशस्वी स्पर्धकांची निवड ऑल इंडिया जी व्ही मावळणकर शॉर्टगन स्पर्धा व पश्चिम विभागीय नेमबाजी शॉर्ट गन स्पर्धेसाठी झाली आहे.या स्पर्धेसाठी जे बी कुसाळे फाउंडेशनच्या 15 नेमबाजानी भाग घेतला आहे.यामध्ये ट्रॅप व डबल ट्रॅप या प्रकारात फाउंडेशनच्या 9 नेमबाज यांनी पात्रता फेरी पार केली आहे.यात अब्दुल हमीद मिरशिकारी, अजय ठाकूर, डॉक्टर शैलेंद्र मुटगेकर, अंशू राव ( सर्व ट्रॅप व डबल ट्रॅप) आणि उल्हास सहस्त्रबुद्धे, आर्या पाटील, समरजीत सिंह राजकुमार, अतिथी पाटील, शाहिद जमादार ( सर्वांना डबल ट्रॅप) यांचा समावेश आहे.या स्पर्धेसाठी सर्वांना आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक तेजस कुसाळे, रमेश कुसाळे, जे बी कुसाळे फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पना कुसाळे, उपाध्यक्ष अभिजीत पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

