
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना एकत्र येऊन.सालाबाद प्रमाणे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात याही वर्षी क्रांतीबा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वैचारिक व सामाजिक प्रबोधनात्मक उद्देश समोर ठेवून साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला. या मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रेमानंद मौर्य यांची अध्यक्षपदी तर युवा कार्यकर्ते व पत्रकार वैभव प्रधान यांची सरचिटणीस पदी एकमताने निवड करण्यात आली.यावेळी नामदेव कोथळीकर व रोहन वाघमारे यांची उपाध्यक्ष म्हणून ही निवड करण्यात आली. जयंती समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष सरचिटणीस व उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांना विचारण्यात आल्यानंतर अनेक कार्यकर्ते तयार झाले परंतु अनुभव आणि असलेली क्षमता लक्षात घेऊन या आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचा कार्यक्रमांना गालबोट न लागता संयम आणि सूत्रबद्ध पद्धतीने हे कार्यक्रम व्हावेत हा हेतू ठेवून ही निवड करण्यात आली. यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते उत्तम कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेच परंतु या काळामध्ये ती सूत्रबद्ध आणि वैचारिक रीतीने सर्व जिल्ह्यातील आंबेडकरवादी व बहुजन समाजाला एक चांगला आदर्श व दिशा देईल अशी झाली पाहिजे. जरी हा आचारसंहितेचा काळ असला तरी देखील चळवळीतील सर्व नेते या समितीच्या प्रत्येक कार्यात आणि मार्गदर्शनात बरोबर असतील.तर डी.जी भास्कर म्हणाले की , ही जयंती जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन कोल्हापुरातील सर्व आंबेडकरवादी समाजात जागृती आणण्यासाठी प्रयत्न करेल असे या समितीने कार्यक्रम राबवावेत. यावेळी नूतन अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी आपलं मनोगत व्यक्त करून फक्त राजकीय नाही तर सामाजिक तसेच शासकीय आणि प्रत्येक क्षेत्रातील समाज बांधव व बहुजन समाजातील मान्यवरांना व चळवळीतील कार्यरत कार्यकर्ते यांना सामावून घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वर्षभरामध्ये जे कार्यक्रम आखण्यात येतील ते फुले शाहू आंबेडकर यांचा विचारांचा जागर करणारेच असतील असे सांगितले यानंतर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष प्रेमानंद मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर पीपल्सचे अध्यक्ष डीजी भास्कर यांच्या हस्ते नूतन सरचिटणीस वैभव प्रधान यांचा सत्कार करण्यात आला तसेच चळवळीच्या नेत्यांकडून उपाध्यक्ष रोहन वाघमारे व नामदेव कोथळीकर यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी मागील अध्यक्ष सदानंद दिघे नूतन सरचिटणीस वैभव प्रधान यांनी आपली मनोगते व्यक्त केली यानंतर ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीबा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला नूतन कार्यकारिणी व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या निवडी प्रसंगी व बैठकीला चळवळीचे नेते मंगलराव माळगे, बाळासाहेब भोसले, सुभाष देसाई, बाजीराव नाईक,आर.एस. कांबळे, बाळासाहेब वाशीकर, जयसिंग जाधव, विश्वजीत कांबळे,रमेश कांबळे, अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे, दत्ता मिसाळ,सुखदेव बुध्याळकर,संजय जिरगे, प्रदीप मस्के,साताप्पा हेगडे, राहुल कांबळे, अतुल सडोलीकर, सुरेश कुरणे, प्रवीण आजरेकर, सचिन कोनवडेकर,अमित काळे, यासहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

