
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर गडहिंग्लज येथील आरोपी रेखा भैरू लोहार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल,ब.नं.370 नेमणूक – गडहिंग्लज पोलिस ठाणे (वर्ग -03)रा. हरळी रोड, लक्ष्मी नगर जवळ मुक्काम पोस्ट,भडगाव ता. गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर
तक्रारदार व त्याची पत्नी यांच्यावर गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्याकरीता आलोसे हिने तक्रारदार यांचेकडे 2,000 रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्याना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई श्री सरदार नाळे ,पोलीस उपअधीक्षक सापळा पथक श्रीमती असमा मुल्ला, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.कोल्हापूर
सपोफो प्रकाश भंडारे,पोहेकॉ अजय चव्हाण,
पोहेकॉ सुधीर पाटील,मपोकॉ पुनम पाटील व टीम यांनी कारवाई केली.

