हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मानेंचा पत्ता कट? शिवसेना शिंदेंगटाकडुन माजी खा निवेदिता माने यांच्या उमेदवारीची शक्यता

0
279

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर: राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथी घडतं असून शिंदेंगटाच्या सहा खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध लक्षात घेता हे दोन्ही उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यातच आता धैर्यशील मानेंच्या ठिकाणी त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने यांची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून राज्यातल्या आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. या दोन्ही नावांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणचे उमेदवार मागे घेण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन चेहरे देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली शिंदे गटात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. निवेदिता मानेंनीही त्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवेदिता माने या धैर्यशील माने यांच्या मातोश्री असून त्यांनी या आधी दोन वेळा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे.

भाजपचा विरोध असला तरी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धैर्यशील माने यांनाच संधी दिली. पण आता त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागते की काय अशी परिस्थिती आहे. कोणत्याही स्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर उमेदवारी बदलण्य़ासाठी मोठा दबाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here