उंड्री येथे झालेल्या अपघातात नांदगाव येथील युवक जागीच ठार

0
486

प्रतिनिधी – सुदर्शन पाटील

पन्हाळा तालुक्यातील उंड्री पैकी चिखलकरवाडी नजीक झालेल्या अपघातामध्ये नांदगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे सागर महादेव पाटील वय 38 असे त्या युवकाचे नाव आहे
ही घटना काल सायंकाळी पाचच्या सुमारास घडली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत सागर महादेव पाटील हा आपली मोटरसायकल घेऊन नांदगाव हुन कोतोली कडे जात असताना पन्हाळा तालुक्यातील उंड्री पैकी चिखलकरवाडी नजीक नवीन करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यावरती आल्यानंतर त्याची मोटर सायकल अचानक घसरली व सागर पाटील हा सिमेंट रस्त्यावरती जोरदार आदळला यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तो जागीच ठार झाला आहे घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती या घटनेची नोंद पन्हाळा पोलिसात झाली आहे सागरच्या पाठीमागे आई-वडील पत्नी व एक लहान लहान मुलगी आहे सागरच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here