आचारसंहितेचे योग्यरित्या पालन होत असल्याबाबत व तक्रारी अंतिम करण्यासाठी स्थायी समितीची जिल्हास्तर व लोकसभा मतदार संघनिहाय स्थापना

0
154

प्रतिनिधी राजेंद्र मकोटे

कोल्हापूर दि. 5 (जिमाका) : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आदर्श आचारसंहितेचे योग्यरित्या पालन होत असल्याबाबत तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून निदर्शनास आणलेल्या आचारसंहिता तक्रारी अंतिम करण्याबाबत स्थायी समिती (Standing Committee) गठीत करण्यात आली आहे. तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मुददे व अन्य बाबी ठरविण्यासाठी स्थायी समिती कामकाज पाहणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी याचा समावेश आहे. उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून जिल्हयासाठी पुढिलप्रमाणे जिल्हास्तरावरील स्थायी समिती (District Level Standing Committee) पुर्नगठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष, सदस्य म्हणून पोलीस अधिक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (मार्क्ससिस्ट), इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष हे सदस्य असतील तर उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी पुढिलप्रमाणे स्थायी समिती गठीत  केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष, सदस्य म्हणून पोलीस अधिक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (मार्क्ससिस्ट), इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष हे सदस्य असतील तर उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर सदस्य सचिव आहेत. ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष, समन्वयक  निवासी उपजिल्हाधिकारी, निमंत्रक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी २८० शिेरोळ वि.स., सदस्य आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (मार्क्ससिस्ट), इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नॅशनल पीपल्स पार्टी, शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्ती पार्टी, वंचित बहूजन पार्टी यांचे जिल्हाध्यक्ष व प्रतिनीधी हे सदस्य असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here