
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर : हिंदू आणि मुस्लिम बांधवाना एकाच छताखाली विविध वस्तुंची खरेदी करता यावी ,या उद्देशाने भरवल्या जात असलेल्या रमजान ईद फेस्टिवलचे आज बिंदु चौक परिसरात थाटात उद्घाटन झालं .

मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणीभाई आजरेकर आणि त्यांचे सहकारी गेली पंचवीस वर्षे या फेस्टीवलचे आयोजन करत आहे .मुस्लिम आणि हिंदू बांधवाना ईदच्या निमित्तानं तयार कपड़े ,सखीर मसाला ,सौंदर्यप्रसाधने ,अत्तर , सुगंधित द्रव्ये , धान्य , सूका मेवा , पादत्राणे , इमिटेशन ज्वेलरी ,मेहंदी , लेडी पर्स , आदि साहित्य ना नफा – ना तोटा तत्वावर उपलब्ध होत असल्यानं मुस्लिम आणि हिन्दु बांधव मोठया प्रमानात या फेस्टीवलचा लाभ घेतात ,फेस्टिवलचे यंदाचे सव्वीसावे वर्ष आहे .

आज सायंकाळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि कोल्हापूर उत्तरच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या हस्ते या रमजान ईद फेस्टीवलच्या उदघाटनाचा दिमाखदार सोहळा झाला . यावेळी माजी महापौर आर के पोवार ,नीलोफर आजरेकर , माजी उपमहापौर हरिदास सोनावणे ,माजी नगरसेवक ईश्वर परमार ,मेहजबीन सुभेदार , राजू यादव, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलबारी , उद्योगपती जयेश कदम ,संजय कदम , इकबाल नूरानी , फिरोज सरगुर, नासर धारवाड़कर , आदि मान्यवर उपस्थित होते . यावेळी पत्रकार समीर मुजावर संपादित दिनमान या ईद विषेशांकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले . संयोजन गणीभाई आजरेकर , रहीम महात , मुश्ताक तहसीलदार , अब्दुलहमीद मीरशिकारी ,समीर पटवेगार , मुस्तफा मनेर , नीलेश भोसले , तौसीफ सोलापूरे आदिनी केले . ११ एप्रिलपर्यंत हे फेस्टिवल सकाळी दहा ते रात्री दहा यावेळेत सर्वाना खुले राहणार आहे .






