सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडिए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी या दोघांना समान म्हणजे ४१ टक्के मिळत असल्याचे दिसते आहे. १० एप्रिलपासून मोदी महाराष्ट्रात निवडणूक अभियान सुरू करणार आहेत. राज्यात त्यांच्या तब्बल १८ सभा होणार आहेत. याच सुमारास एबीपी न्यूज आणि सी-वोटर यांनी राज्यात सर्वेक्षण केले आहे. त्याचा भाजपला फटका बसू शकतो कारण साधारण एक महिन्यांपूर्वी भाजप पुढे असल्याचे दिसत होते. मात्र आता पक्ष मागे पडत असल्याचे आढळून येते आहे.
सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडिए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी या दोघांना समान म्हणजे ४१ टक्के मिळत असल्याचे दिसते आहे.
मागच्या महिन्यात एनडीएच्या खात्यात ४३ टक्के मते जातील असा अंदाज वर्तवला गेला होता. तर इंडियाला ४२ टक्के तर अन्य पक्षांच्या खात्यात १५ टक्के मते जातील असा अनुमान होता. आता ताज्या सर्वेक्षणात अन्य पक्षांची मते वाढत असल्याचे दिसत असून १८ टक्के मते त्यांच्याकडे जातील असे भाकित आहे.
दरम्यान, हा सर्वे आला असला तरी आता एकनाथ शिंदेंनी बंड केले तेव्हा ४० आमदार व १३ खासदार सोबत आले. मात्र त्यांनाच न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे. आधीच भाजपने मंत्रिमंडळ विस्तार न केल्याने दहा-पाच आमदारांच्या स्वप्नांवर पाणी फेरलेे. आता सर्वेक्षणाची भीती दाखवून खासदारांची तिकिटे कापण्यासाठी व त्यांचे मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपकडून दबाव टाकला जात आहे. हे सर्व होत असताना शिंदे मात्र हतबल झालेले दिसतात. त्यामुळे समर्थकांत रोष वाढत आहे.

