
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक कोल्हापूर कार्यालयामार्फत माहे जून 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत एन.सी.सी. भवन, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी प्रतिदिन सकाळी न्याहारी, चहा, बिस्कीट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, बिस्किट, संध्याकाळी जेवण हे शिबीर अन्नश्रेणी यादी (मेनू) नुसार पुरवठा करण्यासाठी (प्रत्येक व्यक्ती प्रती दिन) खर्चाचे दरपत्रक मागविण्यात येत आहे. हे दरपत्रक दि. 15 मे 2024 पर्यंत समादेशक अधिकारी, 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर यांच्याकडे पोहोचतील याप्रमाणे पाठवावीत, असे आवाहन 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथकाचे समादेशक अधिकारी कर्नल मानस एस दिक्षित यांनी केले आहे.

