छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या दुरुस्ती दरम्यान रुग्णांनी व रुग्णालय प्रमुखांनी प्रशासनाला सहकार्य करावे

0
173

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर. 10 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरच्या आखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करणे, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतीतील आंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. यादरम्यान सर्व रुग्णांनी व संदर्भित करणाऱ्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांनी केले आहे.

या दुरुस्तीच्या कामाच्या दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता प्रशासनाकडून टप्प्याटप्याने कामे करण्याचे नियोजन केले आहे. बाह्यरुग्ण विभागातील काही विभाग इतरत्र स्थलांतरित करुन तेथील कामे केली जातील. त्याचप्रमाणे आंतररुग्ण विभागातील रुग्ण देखील इतर कक्षात किंवा अतिदक्षता विभागामध्ये योग्यतेप्रमाणे स्थलांतरित करुन उपचार केले जातील. यादरम्यान रुग्णसेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, याची प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल. जेणेकरुन रुग्णांची कोणतीही गैरसोय न होता सेवा देता येईल व भविष्यकाळात यापेक्षाही चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देता येईल, असेही श्री. मोरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here