
प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
मुंबई: हिंदू विवाह कायदा स्त्री-पुरुष असा भेद करणारा नसून त्यातील तरतुदींनुसार पत्नी अथवा पतीलादेखील त्याच्या जोडीदाराकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याच मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आजारपण असो अथवा अन्य कारणामुळे उत्पन्न कमावण्यास सक्षम नसलेल्या बेरोजगार पतीला कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा कायदेशीर हक्कच आहे, असं स्पष्ट करत न्यायालयाने बेरोजगावर पतीला दरमहा दहा हजार रुपयांची पत्नीने पोटगी द्यावी, असं म्हटलं आहे. नेमकं प्रकरण काय?
कल्याणमध्ये हे प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने संसारात मतभेद होत असल्याने पत्नीपासून विभक्त होण्यासाठी कल्याणच्या न्यायालयात धाव घेतली. पती-पत्नी दोघांनीही पोटगी मागत अर्ज केले. यापैकी पत्नीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, तर पतीचा अर्ज मंजूर करत पत्नीने पतीला १० हजारांची पोटगी दर महा द्यावी असा आदेश दिला आहे.
आजारपणामुळे कमाई करण्यास सक्षम नसलेल्या पतीला कमावत्या पत्नीने दरमहा १० हजार रुपयांची अंतरितम पोटगी द्यावी, असं मुंबई उच्च न्यायालायने म्हटलं आहे.

