सांगली:बैलगाडा शर्यतीच्या वेळी चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू

0
688


प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये उरूसा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या वेळी भरधाव वेगाने आलेल्या बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दि १४ एप्रिल रोजी घडली. रोहन राजेंद्र घोरपडे वय २३ असे मुत्यू झालेल्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. उरूसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन घोरपडे हा तरुण गंभीर जखमी झाला.रोहनला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात केले. मात्र उपचारा आधीच रस्त्यातच रोहनचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाळूज गावात पिराचा उरूस सुरु असून खडी नावांच्या रिकाम्या माळ रानावर बैलगाड्या पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. या परंपरेंनुसार बैलगाड्या पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच वेळी यातीलच एक बैलगाडी धावत असताना थेट बैलगाडा शर्यत बघणाऱ्या बैलगाडा शौकीनाच्या गर्दीत घुसला. या वेळी रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला आणि नेमके त्याच्या अंगावरून बैलगाडीचे चाक गेले. या दुर्घटनेत रोहनचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here