कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 साठी ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी ते मतदार ओळखपत्र सादर करतील. मात्र जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी इतर बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एकाचा वापर करता येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.
भारत निवडणुक आयोगाने ग्राह्य केलेल्या 12 कागदपत्रांमध्ये आधारकार्ड, मनरेगा अंतर्गत दिलेले जॉब कार्ड, छायाचित्र असलेले बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याव्दारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार व आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही श्री. शेंडगे यांनी कळविले आहे.
Home Uncategorized मतदान ओळखपत्र नसेल तरीही इतर बारा प्रकारच्याओळखपत्रांपैकी एकाचा वापर करता येणार-उप जिल्हा...