प्रतिनिधी – सुदर्शन पाटील
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे श्री ज्योतिबा देवाचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीमय व धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही सपत्नीक ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले
जोतिबा देवाच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे चार ते पाच च्या दरम्यान दंड स्नान व दीपोत्सव सोहळा संपन्न झाला यानंतर पाच ते सहा या कालावधीमध्ये गणपती पूजन घंटा पूजन ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी ठीक ६:३३ मिनिटांनी केदारनाथ प्रकट दिन मुख्य सोहळा संपन्न झाला यानंतर सकाळी सात ते नऊ च्या दरम्यान अष्टभैरव लघु रुद्र अभिषेक करून श्री जोतिबा देवाची उत्सव महापूजा बांधण्यात आली होती तर मंदिर गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आले होते सकाळी ९ ते १२ च्या दरम्यान केदार विश्वशांती यज्ञ संपन्न झाला त्यानंतर दुपारी १२:३० वाजता श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते पूर्णाकृती करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व देवस्थान समितीचे प्रभावती धैर्यशील तिवले यांनी सपत्नीक होमाची पूजा केली प्रकट दिन सोहळा निमित्त हजारो भाविकांनी जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात जोतिबा देवाचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान समितीचे माजी प्रभारी दिपक म्हेत्तर ग्रामसेवक जयसिंग बिडकर गुरुदेव अमर झुगर विश्वास झुगर सचिन ठाकरे उमेश शिंगे आदी मान्यवरण सह विविध सालकरी मानकरी व देवसेवक उपस्थित होते