
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
सिंधुदुर्ग : मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शनिवार दि २० एप्रिल पर्यंत पर्यटकांना राजकोट किल्ल्यात प्रवेश करता येणार नाही, अशी माहिती मालवण प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
नौदल विभागाच्या वतीने राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्राथमिक देखभाल केली जात आहे, दरम्यान पर्यटकांसाठी खास सूचना फलक राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर देखील लावण्यात आला आहे.

