
निसर्ग संवर्धन आणि जलप्रबोधनासाठी चा उपग्रह -शिवाजी विद्यापीठ परिसरात शुभेच्छा..
कोल्हापूर – निसर्ग संवर्धन आणि जलसाक्षरता प्रबोधनाच्या हेतूने व्यापक प्रबोधन करण्यासाठी कोल्हापूरची आठ उद्योजक दोन मोटारीतून 60 दिवसाच्या प्रवासाला आज सकाळी रवाना झाले प्रताप बापू कोंडेकर आणि हेमंत शहा यांच्या नेतृत्वाखाली हे निसर्ग प्रेमी उद्योजक रवाना झाले आहेत .

आज सकाळी शिवाजी विद्यापीठ प्रांणगांत शिवाजी विद्यापीठाचे ए . एस . पाटील , व्ही एम शिंदे यांच्यासह डॉक्टर संदीप पाटील मराठा महासंघाचे शशिकांत पाटील उदय पाटील डॉक्टर हरीश नांगरे यांच्यासह राजीव लिंग्रज आणि विविध मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या . छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत ही दोन्ही पदके रवाना झाली आहेत . येत्या 22 जून पर्यंत 13 देशातून त्यांचा प्रवास होणार असून भारतातून नेपाळ मार्गे चीन रशिया कजाकिस्तान गॉर्जिया उज्वॅगीस्ताल तुर्की साबिया बेल्जियम सह ते लंडनमध्ये प्रवास करणार आहेत या सर्व ठिकाणी विविध मान्यवरांना भेटत तसेच राजकीय प्रमुखांना भेटत ते जलसाक्षरता आणि निसर्ग संवर्धन यासाठी संवाद साधणार आहेत अशी माहिती संदीप पाटील यांनी देत त्यांनी सर्वाच्या वतीने शुभेच्छा दिल्या .कोल्हापूरच्या उद्योग विश्वातून सामाजिक बांधिलकीतून आम्ही हा उपक्रमात सुरू केला असल्याची माहिती देत सर्वांच्या सहकार्यानेच यामध्ये आम्ही यशस्वी असे सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना प्रताप उर्फ बापू कोंडेकर यांनी सांगितले आहे .हा दौरा पूर्ण झाल्यानंतर त्यांचा भव्य अनुभव कथना कार्यक्रम ही कोल्हापुरात घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे .

