कोल्हापूर दिनांक 16 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठीचे मतदान दिनांक 7 मे 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना
सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाची सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही या अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.