यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; लखनऊचा आदित्य श्रीवास्तव ठरला देशात टॉपर

0
130

प्रतिनिधी/ अभिनंदन पुरीबुवा

:यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; लखनऊचा आदित्य श्रीवास्तव ठरला देशात टॉपर पुरीबुवा देशभरातील उमेदवार केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या २०२३ ला झालेल्या परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. आता या उमेदवारांची प्रतिक्षा आज संपली आहे. केंद्रीय लोक सेवा आयोगाने यूपीएससी सीएसई परीक्षेचा निकाल आज मंगळवार दि १६ एप्रिल २०२४ रोजी दूपारी १ वाजण्याच्या सुमारास जाहीर केला.
यूपीएससी सीएसई परीक्षेत आदित्य श्रीवास्तव देशात टॉपर ठरला आहे. तर दुसरा क्रमांक अनिमेष प्रधानने पटकावला आहे. तर तिसरा क्रमांक अनन्या रेड्डीने पटकावला आहे. तसेच चौथा क्रमांक पीके सिद्धार्थ रामकुमारने पटकावला आहे. तर पाचवा क्रमांक रुहानीने पटकावला. ही परीक्षा ११४३ जागांसाठी झाली होती. यातील १०१६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती.
या परीक्षेत सर्वसाधारण वर्गातून ३४७, ईडब्ल्यूएस वर्गातून ११५, ओबीसी वर्ग ३०३, एससी वर्ग १६५, एसटी वर्ग ८६ इतके उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १०१६ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच ३५५ जणांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे.यूपीएससीची पूर्व परीक्षा ही मागच्या वर्षी २८ मे २०२३ रोजी आयोजित केली होती. जे उमेदवार पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले, ते उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यूपीएससी सीएसई मुख्य परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर २०२३ रोजी घोषित झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here