प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर दि. 18 (जिमाका): गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 12 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी संदिप नामदेव शिंदे (पक्ष –बहुजन समाज पार्टी) 1 अर्ज, संदिप भैरवनाथ कोगले (पक्ष –देश जनहित पार्टी) 2 अर्ज व अपक्षमधून 2 अशी 4 नामनिर्देशनपत्र, नागनाथ पुंडलिक बेनके (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, संदिप गुंडोपंत संकपाळ (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, संतोष गणपती बिसुरे (पक्ष –अपनी प्रजाहित पार्टी) 1 अर्ज, कृष्णा हणमंत देसाई (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, सलीम नुरमंहमद बागवान (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, सुनील नामदेव पाटील (पक्ष –नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी) 1 अर्ज, राहुल गोविंद लाड (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, बसगोंडा तायगोंडा पाटील (पक्ष –भारतीय जवान किसान पार्टी) 1 अर्ज, विरेंद्र संजय मंडलिक (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, शशिभूषण जीवनराव देसाई (पक्ष –अखिल भारत हिंदू महासभा) 1 अर्ज व अपक्ष 1 अर्ज अशी 2 नामनिर्देशनपत्रे अशा 12 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल केले.
48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी रविंद्र तुकाराम कांबळे, (पक्ष- बहुजन समाज पार्टी) 1 अर्ज, देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष) 1 अर्ज, बाबासो यशवंतराव पाटील, (अपक्ष) 1 अर्ज, रघुनाथ रामचंद्र पाटील, (पक्ष- भारतीय जवान किसान पार्टी) 1 अर्ज, डॉ. श्री. ईश्वर महादेव यमगर, (पक्ष- भारतीय लोकशक्ती पार्टी) 1 अर्ज, आनंदराव तुकाराम थोरात, (पक्ष- अपक्ष) 1 अर्ज, म्हेत्रे बाळकृष्ण काशिनाथ (पक्ष- अपक्ष) 1 अर्ज, संतोष केरबा खोत, (पक्ष-कामगार किसान पार्टी) 1 अर्ज, अपक्ष 1 अर्ज अशी 2 नामनिर्देशनपत्रे, मनोहर प्रदीप सातपुते, (अपक्ष) 2 अर्ज, इम्रान इकबाल खतिब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी) 1 अर्ज, श्री. जगन्नाथ भगवान मोरे, (अपक्ष) 1 अर्ज, धनाजी जगन्नाथ गुरव (पक्ष-लोकराज्य जनता पार्टी) 1 अर्ज, पाटील दादासाहेब/दादगोंडा चवगोंडा (पक्ष – वंचीत बहुजन आघाडी) 2 अर्ज व रामचंद्र गोविंदराव साळुंखे (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, अशा 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली आहेत.
दिनांक 18 एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 3 इच्छुक उमेदवारांनी 4 नामनिर्देशनपत्रे तर 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी 20 नामनिर्देशनपत्रे घेतली.