नरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरातील तपोवन मैदानात जाहीर सभा !राजेश क्षीरसागरांची माहिती

0
80

. प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर :लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २८ एप्रिल २०२४ रोजी कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. तपोवन मैदान येथे सभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
महायुतीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने उमेदवार आहेत. महायुती अतंर्गत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली आहे.
या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीतील सगळे घटक पक्ष सक्रिय आहेत. दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून आणायच्या या उमेदीने महायुतीतील नेतेमंडळी काम करत आहेत. दरम्यान महायुतीतील या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची कोल्हापुरातील सभा निश्चित झाली आहे. मंडलिक व माने यांच्या प्रचारासाठी मोदी यांची २८ एप्रिल २०२४ रोजी तपोवन मैदान येथे सभा होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी दिली आहे. या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे २८ एप्रिल रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here