विहिरीच्या पाण्यात बुडून एकुलता एक मुलाचा मृत्यू कागल तालुक्यातील चिमगाव मधील घटना

0
168


प्रतिनिधी-प्रदिप अवघडे
पोहण्यासाठी गेलेल्या शालेय
विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चिमगाव (ता. कागल) येथे सोमवार (दि 29) रोजी दुपारी 12च्या सुमारास घडली. येथील शिवराय विद्यालय मुरगूड शाळेत नववीत शिकणारा प्रशांत रामचंद्र करडे (वय १३,चिमगाव ता कागल(माळवाडी विठ्ठल नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दुदैवी मृत्यूने चिमगाव गावावर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आढळून आला नाही. त्याचा मृतदेह गाळात रुतून अडकला असल्याचा प्राथमिक अंदाज आला. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली .
याबाबत अधिक माहिती अशी, उनाची तंवर्ता जास्त व ऊनही पडल्याने प्रशांतसह त्याच्या मित्रांनी दुपारी आपल्या मित्रांसोबत चिमगाव ते आवचिवाडी दरम्यान असणाऱ्या वगदेवहिर अंघोळीचा बेत आखून दुपारी 11-12च्या सुमारास पोहण्यासाठी चार-पाचजण गेले होते. झरा जवपासा अल्यामळे वहिर पाण्याने तुडुंब भरली होती. मृत प्रशांतयाने सर्व मित्रांच्या अगोदर पोहण्याच्या इराद्याने पाण्यात उडी मारली मात्र तो पुन्हा मित्रांना दिसलाच नाही. विहीरीत भरपूर पाणी व गाळ असल्याने तो गाळात रुतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. अखेर घाबरलेल्या मित्रांनी आरडाओरडा केली असता ही बातमी वाऱ्यासारखी विठ्ठलनगरसह चिमगावात पसरली.
आई-वडिलांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याचे चप्पल, कपडे वहिरीवर पडल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून मृत प्रशांतचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न केला मात्र त्याचा मृत्यूदेह आढळून आला नाही. प्रशांतलच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करडे परिवारावर दुःखाचे मोठे संकट कोसळले आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता. प्रशांतचे वडील उसतोडीचे व इतर मजूरी काम
करत आसतात व म्हणून कामाला गेले होते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here