प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा आज २७ एप्रिल २०२४ रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानात पार पडली यावेळी सभेसाठी व्यासपीठावरुन उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषण करताना थेट गादीचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींच्या गेल्या १० वर्षाच्या विकासकामांचा दाखला देत, मान देऊ गादीला, मत देऊ मोदीना अस म्हणत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. कोल्हापुर मतदारसंघातील लढाई संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही किंवा धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी नाही. तर, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरातील सभेत शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान आपण श्रीरामांना मानतो, मग प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आहे. श्रीरामांच्या हातातील तोच बाण संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या हातात आहे. त्यामुळे, मोदींच्या हातातही धनुष्यबाण आहे. कोल्हापुरात महायुतीच्या काळात टोलमाफ केला , पण महाविकास आघाडीने पुन्हा टोल सुरू केला. कोल्हापूर जिल्हा हा भगव्याच्या मागे उभा राहणारा आहे, देशभक्तांच्या मागे उभे राहणारा जिल्हा आहे. देशाला मोदींच्या रुपाने असा नेता मिळाला आहे, ज्यांनी देशाला सुरक्षित केलं, देशाला स्वाभीमान दिला, देशाला विकसित केलं. यापूर्वी आपले पंतप्रधान अमेरिकेकडून विणवण्या करायचे, पण मोदींजी सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. आपल्या सर्वांना माहीत आहे की, हा देश आता मिसाईलवाला झालाय. मोदींनी नवभारताची नवनिर्मिती केली आहे. कोविडच्या महामारी च्या त्या काळात आपले नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते. जगातील लोकं म्हणायचे भारतातील ४० ते ५० कोटी जनता मेल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण जग चिंतेत होते, पण भारतात एक वाघ पंतप्रधान होते. या वाघाने आपल्या शास्त्रज्ञांना सांगून कोविडची लस भारतात तयार करून घेतली त्यामुळे, भारतातील लोकं जिवंत आहेत. त्यामुळे, मी म्हणेन, आज आपण जिवंत आहोत ते मोदींमुळेच, जान है तो जहान है… म्हणून मोदींना आज मत द्यायचं आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मतदान करुन मोदींना मत द्यायचं आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरातील जनेतेला आवाहन केलं.