प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धर्यशील माने व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा कोल्हापुर येथील तपोवन मैदानात पार पडली. यावेळी नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नेहमी च्या शैलीत मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा आपल्याला सत्तेत आणण्याचं आवाहन केलं.मोदींनी यावेळी आपल्या सरकारनं राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामांची उजळणी केली. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, राम मंदिराची उभारणी, सीएएची अंमलबजावणी याचा समावेश होता. तसेच काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसनं सनातन धर्मा विरोधात भूमिका घेतल्याचं सांगितलं, तसेच राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं टाळलं याची देखील यावेळी बोलताना आठवण करुन दिली.