राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक जैन सेल प्रदेश अध्यक्ष पदी श्री राजेंद्र शाह यांची निवड

0
80

वरिष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रदेशअध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाचे अध्यक्ष मा. राजेंद्र सी. शहा रा. कोल्हापूर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक जैन सेल महाराष्ट्र राज्य प्रमुख पदी
पत्र देवून निवड जाहीर केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मा. राजेंद्र शहा यांनी अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या माध्यमातुन 15000 परिवार जोडलेले आहेत. महासंघाच्या 35 महिला शाखा कार्यरत आहेत. अल्पसंख्यांक स्तरावर समाजाला न्याय मिळवून द्यावा याकरिता पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राज्यभर समाजासाठी कार्य उभा करताना सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
मा. राजेंद्र शहा म्हणाले शासन दरबारी समाजाचे प्रश्ण मार्गी लागावेत आणि सरकारची अल्पसंख्यांक योजना समस्त जैन समजापर्यंत पोहचावी या उद्देशाने प्रदेश पातळीवर आम्हाला प्रतिनिधित्व दिले आहे. जैन समाजात सुद्धा ३५% गरजू लोक आहेत. त्यांना अल्पसंख्यांक योजनांचा लाभ मिळाला पाहिजे जैन समाजातील मुलामुलींचे शिक्षण आणि नोकरी याबाबत प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती.
सर्व समाजाला एकत्रित घेवून जिल्हास्तरीय दौरा करणार असल्याचे ही त्यांनी या वेळी सांगितले.
यावेळी स्नेहलभाई मणियार, भालचंद्रभाई शहा, जितेंद्र शहा, विवेकभाई शहा, महेश ओसवाल, अमित शहा, भूषण शहा, अभय शहा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here