दुबई/प्रतिनिधी: आकिब जहांगीर
रायगड: म्हसळा तालुका जिल्हा रायगड येथील तरुण उद्योजक आयटी अधिकारी श्री.तबरेझ लियाकत गोयलकर यांना युरोप मध्य – पूर्व आणि आफ्रिका मधील (EMEA) टॉप 50 एक मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार 24 एप्रिल 2024 शांग्री-ला , दुबई येथे मोठा दिमाकांत संपन्न झाला.
जागतिक मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी 50 अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.युरोपमध्ये पूर्व आणि आफ्रिका यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.50 अधिकाऱ्यांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. म्हसळा तालुक्यातून तबरेझ लियाकत गोयलक यांचे कौतुक होत आहे.त्याचबरोबर नागरिकांत शुभेच्छाचा वर्षााव होत आहे..तबरेझ लियाकत गोयलक यांनी सतरा वर्षापेक्षा जास्त आयटी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हा जागतिक टॉप 50 पुरस्कार पैकी एक पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित केले आहे.
त्यांनी आतापर्यंत अथक परिश्रमातून केलेल्या कामाचे चीज झाले असे म्हणावे लागेल.त्यांनी जिद्द चिकाटी आणि परिश्रम करत आज त्यांचा एवढा मोठा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे..तबरेझ लियाकत गोयलक त्यांच्या परिवाराकडून मित्रांकडूनयांच्या परिवाराकडून मित्रांकडून व सर्व नागरिकांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.