टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यासाठी 3 ते 5 मे दरम्यान सुविधा केंद्रे कार्यान्वित

0
74

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 47 कोल्हापूर लोकसभा अंतर्गत निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांचे टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करुन घेण्यासाठी दिनांक 3 ते 5 मे 2024 रोजी फॅसिलिटेशन सेंटर (सुविधा केंद्र) स्थापन करण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

47- कोल्हापूर लोकसभा मतदार संघ-
विधानसभा मतदार संघ क्षेत्र 271 गडहिंग्लजसाठी- (गडहिंग्लज, चंदगड, आजरा साठी) बचत भवन, पंचायत समिती समोर, गडहिंग्लज ता. गडहिंग्लज

विधानसभा मतदार संघ क्षेत्र 272 – राधानगरीसाठी- (राधानगरी, भुदरगड साठी) तालुका क्रीडा संकुल, मौनी विद्यापीठ, गारगोटी

विधानसभा मतदार संघ क्षेत्र 273- कागलसाठी – महसूल नायब तहसीलदार यांचा कक्ष, दुसरा मजला, तहसील कार्यालय कागल, ता. कागल

47-कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील फॅसिलिटेशन सेंटर (सुविधा केंद्र) दि. 2 ते 6 मे 2024 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी शाखेत सुरु आहे. या ठिकाणी विधानसभा मतदार संघ 274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर, 276 कोल्हापूर उत्तर मधील मतदारांना मतदान करता येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी कळविले आहे.
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here