गोकूळ दूध संघाच्या गडमुडशिंगी येथील पशुखाद्य कारखान्यात मोठा अपघात! एका कामगाराचा मृत्यू तर ३ जखमी

0
134

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : गोकुळ दूध उत्पादक संघाच्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नजीक असणाऱ्या गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. संघाच्या पशुखाद्य कारखान्यात अमोनिया वायूने चार मजूर बेशुद्ध पडले. यामध्ये तिघांना वाचवण्यात यश आले तर एका मजुराचा मृत्यू झाला आहे. पाण्याची टाकी साफ करत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोल्हापूर अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे. मागच्या महिन्यात ‘गोकुळ’चा गडमुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत आला होता.गोकुळ दूध संघाचा पशुखाद्य कारखान्यात आज पाण्याची टाकी साफ करण्यासाठी काही कामगार टाकीत उतरले होते. मात्र, टाकीत असलेल्या अमोनिया वायूने चार कामगार बेशुद्ध पडले. ही घटना समजताच त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. संजय कांबळे, वय ५५ असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर राजेश बांदिग्रे वय ३५, संभाजी दाभाडे वय ४५, दिपक भोई अशी जखमी कामगारांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here