तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर

0
99

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील तोफा आज थंडावल्या आज ५ मे रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात भव्य रोड शो केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टू व्हीलर रॅली मध्ये सहभाग घेऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याची आवाहन केले.
यावेळी शिवसैनिकांनी केलेली गर्दी पाहता अवघे शहर भगवेमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले. आज सांयकाळी ५ वाजता प्रचाराची सांगता होणार झाली. दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून या टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची आणि राज्यात चर्चेचा विषय ठरलेली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची समजली जात आहे. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.शनिवार दि ४ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर येऊन कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी विशेष जोडण्या लावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही चित्र आहे. प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना आज दि ५ मे रोजी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या टू व्हीलर रॅली मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली.प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उन्हाचा प्रचंड तडाका असतानाही शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रस्त्यावर दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी या दोन्ही जागा जिंकून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here